logo

“स्त्री हे पूर्ण वर्तुळ आहे. तिच्यामध्ये निर्माण, पालनपोषण आणि परिवर्तन करण्याची शक्ती आहे.” -न्यायमूर्ती एस. जे. निंबाळकर.

*“स्त्री हे पूर्ण वर्तुळ आहे. तिच्यामध्ये निर्माण, पालनपोषण आणि परिवर्तन करण्याची शक्ती आहे.”*

वसमत शहरातील अमृतज्ञान सेवा संस्था संचलित लाल बहादुर शास्त्री विद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्षा सौ.संजना चव्हाण यांच्या हस्ते कर्तुत्वान विधीज्ञ महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्रीमती. एस. जे. निंबाळकर (दिवाणी न्यायाधीश वसमत),श्रीमती. डी.बी.आंबेकर (सिनियर क्लर्क वसमत),श्रीमती. राजेश्वरी वैजवाडी(ज्येष्ठ अधिवक्ता),श्रीमती. एस.बी. गौळ(अधिवक्ता) श्रीमती के.डी.सोनी (अधिवक्ता) प्रि-प्रायमरी विभागाच्या प्रमुख श्रीमती दुर्गाताई ढेपे उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करून करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती शामा गरुडकर यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
यावेळी दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस. जे. निंबाळकर यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगताना सांगितले की,
माया,ममता,प्रेम,स्नेह, वात्सल्याची मूर्ती म्हणजे स्त्री होय.महिला दिवस साजरा करण्याचा मुख्यउद्देश महिलांप्रती जिव्हाळा,आदर व्यक्त करण्याबरोबरच महिलांनी सामाजिक,आर्थिक राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दाद देणे हा होय. असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरवाडे व आभार प्रदर्शन श्रीमती दुर्गाताई ढेपे यांनी केले.अशाप्रकारे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला....

259
8352 views